Share

अहमदनगरची कोरोना स्थिती हाताळण्यासाठी आलेले मुश्रीफ, दुसऱ्या दिवशी स्वतः कोरोना बाधित झाले!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यासंदर्भात गुरुवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. जिल्ह्याचा दौरा करून गेल्यानंतर हसन मुश्रीफ यांचा काल कोरोना तपासणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची तब्येत ठीक आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मुश्रीफ यांनी ट्विट करून सांगितले आहे. गुरुवारी त्यांनी नगरमध्ये आढावा बैठक घेतली होती. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी अहमदनगरला कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. परंतु येथून गेल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे गुरुवारी बैठकीसाठी उपस्थित असलेले अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच पदाधिकार्‍यांची चिंता वाढली आहे. संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी म्हणून आपली कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.

अहमदनगर येथे झालेल्या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आ.संग्राम जगताप, महापाैर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, महापालका आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.सुनील पोखरणा, अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त अशोक राठोड, महापालिका आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डाॅ.दादासाहेब साळुंके आदी उपस्थित होते. तसेच मुश्रीफ यांना अनेक संघटनांनी तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवेदने दिली आहेत. त्यामुळे या सर्वांची चिंता वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!