Share

#Breaking_News : मंत्री बच्चु कडू यांना कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच आहे. राज्यात उच्चांकी रुग्णांची वाढ होत असतानाच राज्यातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. स्थानिक लोकप्राधिनिधी, बॉलिवूड स्टार्स, ते केंद्रीय मंत्र्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे.

आता आपल्या खास कामाच्या शैलीने लोकप्रिय असलेले कॅबिनेट मंत्री बच्चु कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चु कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर अचलपूर विधानसभेचे ते आमदार असून त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला गेला होता.

‘ माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी.’ असे आवाहन त्यांनी केले आहे. बच्चु कडू हे जनसामान्यांच्या संपर्कात असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे गेल्या काही दिवसात त्यांचा अनेकांशी संपर्क आला असल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कालच राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!