Share

‘नशीब आता मी जेल बाहेर आहे’ ; छगन भुजबळांना आठवलं कारागृह

Published On: 

नाशिक : गेले पाच महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने देशासह राज्यात हाहाकार माजवला आहे. या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहेत. तर, राज्यात अनेक पोलीस देखील या काळात कोरोनाग्रस्त होत असून त्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. आता नाशिकमध्ये खास पोलिसांसाठी कोव्हिड सेंटर तयार करण्यात आले आहे.

नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतून हे सेंटर तयार करण्यात आलं आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण दलात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. या सेंटरच्या उद्घाटन समारंभावेळी अन्न आणि खाद्य सुरक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलेल्या आठवणीमुळे भलतीच चर्चा रंगली आहे.

यावेळी त्यांनी बोलताना आर्थर रोड कारागृहातील कैद्यांना कसं कोरोना मुक्त केलं हे त्यांनी सांगितलं. पुढे भुजबळांना आपला आर्थर रोड कारागृहातील अडीच वर्षांचा काळ आठवला. आर्थर रोड जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी होते. मीच अडीच वर्ष होतो. नशीब आता बाहेर आलो आहे. या जेलवर बोलायला माझ्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरी कोणती ? असा सवाल देखील त्यांनी केला. आपल्या वक्तृत्व कौशल्याने भुजबळ कायमच चर्चेत असतात. त्यांच्या कारागृहातील आठवणींनी आता चर्चा रंगु लागल्या आहेत. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!