Share

#Maharashtrabudget2021 : रितेश देशमुख आणि जेनेलियाने ‘या’ कारणासाठी मानले सरकारचे आभार

Published On: 

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१-२२ आज विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी मोठ-मोठ्या घोषणा केल्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे.

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला.अर्थसंकल्पात ‘ईस्टर्न फ्री वे’ मार्गाला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणाही यावेळी अजित पवार यांनी केली. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जेनेलिया डिसूझा आणि रितेश यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री जेनेलिया डिसूझा आणि अभिनेता रितेश देशमूख यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहे. दोघांनीही या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CMKHaExj6mG/?utm_source=ig_web_button_share_sheet

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी मान्य करत स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं नाव आता ईस्टर्न फ्री वेला दिलं जाणार आहे. मुंबईची वाहतूक कोंडी लक्षात घेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पूर्ण मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा मार्ग तयार होऊ शकला, त्यामुळे या मार्गाला आता विलासरावांचं नाव दिलं जाणार आहे.

या रस्त्याची लांबी १६.८ कि.मी. असून दक्षिण मुंबईतील पी डीमोलो रोड पासुन ते चेंबूर येथील पूर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडला जातो. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याची पोचपावती असेल असेही त्यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!