मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच राज्यासह देशभरात कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली होती. यानंतर, कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्य सरकार वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलत आहे.
मात्र, मोठ्या प्रमाणावर नागरिक कोरोना नियम पाळत नसल्याचं दिसून आलं आहे. याचाच परिणाम सद्या रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन दिसत आहे. एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असतानाच राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे.
विदर्भातील अनेक भागात कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट निर्माण होत असल्याने तिथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर, औरंगाबादेत देखील अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यात गेले काही दिवस रोज दहा हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडत आहे. स्थिती हाताबाहेर गेल्यास पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
काही दिवसांची स्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक सुरु आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील व्हीसीद्वारे उपस्थित आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार ? या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- UPSC साठी अर्ज भरणाऱ्या इतर मागासवर्गातील उमेदवारांना प्राधान्याने मिळणार नॉन-क्रिमीलेयर दाखला
- हा तर भगवंतालाही फसवणारा अर्थसंकल्प : आचार्य तुषार भोसले
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
- घायवळ,आंदेकर,मारणे पाठोपाठ आणखी एका कुख्यात गुंडाच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’


