मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१-२२ आज विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी मोठ-मोठ्या घोषणा केल्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जगभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळं अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. देशात आणि त्यातही महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
या अर्थसंकल्पावर कॉंग्रेस चे नेते व महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. यावेळी ते म्हणाले कि, ‘कोरोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती विपरित आहे. उत्पन्नाचे स्त्रोत कमी झालेले आहेत. केंद्र सरकारचे भरीव सहकार्य तर सोडाच पण राज्याच्या हिस्स्याचे पैसेही वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीतही एक चांगला, वस्तुनिष्ठ असा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे अभिनंदनास पात्र आहेत.
या अर्थसंकल्पात कुठेही बडेजाव नाही, पोकळ घोषणा नाहीत आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, शेतकरी, महिला तसेच इतर गरजू घटक व क्षेत्रांसाठी आवश्यक त्या तरतुदी करण्याचे काम या अर्थसंकल्पात झाले आहे. महाराष्ट्राच्या सर्व विभागांना व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या ७ हजार कोटी रूपयांच्या नांदेड-जालना महामार्गाची अर्थसंकल्पात घोषणा केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.’ अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लॉकडाऊनमुळे ‘त्यांच्या’वर आत्महत्येची वेळ येऊ शकते’
- अर्थसंकल्पातून नाराज बंजारा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न?
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
- उस्मानाबाद मेडिकल कॉलेज; घोषणा केली भाजपने, पूर्ण केली राष्ट्रवादीने!
- मोठी बातमी! महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, अजित पवारांची घोषणा


