Share

शरद पवार पुन्हा रुग्णालयात,शस्त्रक्रियेनंतर आता प्रकृती स्थिर

Published On: 

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काल रात्री मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलं आहे. पावर यांच्यावर आणखी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान, गेल्या महिनाभरात शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे. यापूर्वी शरद पवार यांच्यावर 12 एप्रिलला पित्ताशयावर यशस्वीपणे पार पडली होती. त्याआधी शरद पवारांना 30 मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

त्यानंतर 12 एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही ट्विट करुन, पवारांच्या प्रकृतीची माहिती दली. “आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अॅडमिट झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारत आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!