Share

नागरिकांचा निष्काळजीपणा सुरूच; केज तालुक्यात केली विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

Published On: 

बीड: जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे, तसेच जिल्ह्याला कोरोनाने विळखा घातला आहे, असे असले तरी देखील काही नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचं दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन म्हणजे कोरोनाला आमंत्रण हे अजून काही बेशिस्त नागरिकांना समजले नाही असे दिसते.   जनजागृती करूनही काही नागरिक मास्कचा वापर करत नाहीत. त्यामुळे केज तालुक्यातील सोनिजवळा ग्रामपंचायतीने मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईत १६ जणांकडून ३२०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

केज जवळच असलेल्या सोनीजवळा या गावात कोरोनाने शिरकाव केला असून गावात दहशत पसरली त्यामुळे कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र आवाहन करूनही लोक नियम पाळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरपंच मुकुंद गायकवाड यांनी ग्रामरोजगार सेवकास एक लेखी आदेश काढून त्यामध्ये सदरील कर्मचाऱ्याने सकाळी ७.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत गावात थांबून जे ग्रामस्थ मास्कचा वापर करत नाहीत, त्यांच्याकडून सक्तीने २०० रुपये दंड आकारून ते पैसे ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ग्रामपंचायतीने दिलेल्या आदेशानुसार गावातील १६ नागरिक विनामास्कचे आढळून आल्याने त्यांच्याकडून ३२०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कितीही प्रेमाने सांगितले तरी लोक ऐकत नसल्याने प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने असे वेगवेगळे उपक्रम राबवून आपले गाव कोरोना संसर्गापासून वाचवले तर कोरोना आटोक्यात यायला वेळ लागणार नाही. मात्र गावकऱ्यांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!