Share

‘राज्यातले सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचे आता कॉग्रेससुद्धा बोलू लागली आहे’

Published On: 

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं सरकारची चिंताही वाढली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता आहे. यात रुग्णांना ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत असल्यानं आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप करण्यात दंग असताना काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका करत घरचा आहेर दिला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे.

याच मुद्द्यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये उपाध्ये म्हणाले की, राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणिबाणी लागू करा, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांनी पंतप्रधान मोदीना लिहिले आहे. राज्यातले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचे आता कॉग्रेससुद्धा बोलू लागली आहे. राज्याला ना धोरण ना दिशा ही आजची अवस्था आहे. हे आता आता सत्ताधारीह कबूल करू लागले आहेत, असे केशव उपाध्ये म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!