🕒 1 min read
Devendra Fadnavis | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमावादावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. सीमावादाच्या समन्वयासाठी नेमलेले महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकातील वादग्रस्त भागाला भेट देऊ शकतात, अशी चर्चा आहे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा दिला आहे. बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी जत तालुक्यातील गावांवर दावा सांगितला आहे. त्यांनी या तालुक्यात पाणी देखील सोडले आहे. त्यामुळे महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा वाद रंगला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयात केस सुरु आहे. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र देखील निर्णय घेऊ शकत नाही. सगळा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. नव्याने कुठला वाद तयार करणे योग्य होणार नाही. महाराष्ट्राने अतिशय ताकदीने आपली केस मांडली आहे. आपण विश्वास ठेवला पाहीजे की आपल्याला न्याय मिळेल. मंत्र्याचा दौरा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने होता. काही मंत्री त्या ठीकाणी जाणार होते. या संदर्भात कर्नाटक सरकारचे काही म्हणणे आहे. महाराष्ट्राचे देखील काही म्हणणे आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. परंतु महापरिनिर्वाण दिनी आपण अशाप्रकारचा वाद तयार करायचा का? हा महत्वाचा विषय आहे. म्हणून या संदर्भात आम्ही विचार करत आहोत. मुख्यमंत्री आम्हाला अंतिम निर्णय देतील. पण आमचे प्राथमिक मत आहे की महापरिनिर्वाण दिन आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे. त्या दिवशी चुकीची घटना व्हावी हे योग्य नाही. आपल्याला भविष्यात देखील त्या ठिकाणी जाता येईल. जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही.”
मुख्यमंत्री बोम्मई यांचा इशारा –
मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, “महाराष्ट्राच्या मंत्र्याने राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा सध्याच्या परिस्थितीत योग्य नागही. त्यांच्या दौऱ्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल. महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा म्हणजे चिथावणीखोर कृत्य आहे. शिवाय, हे लोकांच्या भावना भडकवण्यासारखे आहे.”
महाराष्ट्र राज्यासोबतचा सीमावाद हा कर्नाटकसाठी बंद झालेला अध्याय आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये एकोपा आहे. तसेच सीमेचा वाद आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात देखील आहे, असे बोम्मई म्हणाले.
भाजप-शिवसेना युती सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी 6 डिसेंबर रोजी बेळगावला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “भाजपच्या दबावाला भीक घालणार नाही”, ठाकरे गटातील या नेत्याचा घणाघात
- Sanjay Gaikwad | “प्रसाद लाड पाकिस्तानात जन्मले का? हे तपासावे लागेल”; संजय गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया
- Bacchu Kadu | “एकतर राजा व्हायचं नाही अन् झालं तर…”, बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला
- Ambadas Danve | अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तोंड बंद करुन बसले ; अंबादास दानवेंची टीका
- Shambhuraj Desai | “बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”, शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
