औरंगाबाद : शहरातील नागरिकांना किमान एक दिवसा आड पाणी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती. तसेच त्यासाठी दिलेल्या मुदतीत मनपाने कारवाई केली नाही तर मनपा आयुक्तांचे नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मुदत संपताच मनसेच्या वतीने आयुक्तांच्या बंगल्यात जाणारा नळ तोडला होता. त्यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक झाली असली तरी नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी अशा कितीही केसेस घ्यायला महाराष्ट्र सैनिक तयार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
मनपा आयुक्तांच्या बंगल्याच्या संरक्षण भितींच्या बाहेरुन हे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. त्यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेच्या १० दिवसानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, अशा कारवाईने मनसे घाबरणार नाही, तर या पुढे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मनसेचे जिल्हा संघटक बिपीन नाईक, वैभव मिटकर, राहुल पाटील, प्रशांत दहिवाडकर, मनिष जोगदंड, संकेत शेटे यांचा समावेश आहे. या प्रकरणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यावरुन गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना; मुख्यमंत्री म्हणाले, ‘रात्री बाहेरच का पडल्या?’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘या’ ११ जिल्ह्यांमध्ये लेवल तीन चे निर्बंध कायम; राजेश टोपेंनी केली घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

