🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे. ऋतिक रोशनच्या तक्रारीच्या अनुषंगाने हा समन्स बजावण्यात आला आहे. येत्या शनिवारी ऋतिक रोशनला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययु तर्फे हा समन्स बजावण्यात आला आहे.
अभिनेत्री कंगणा राणावतने पुन्हा एकदा हृतिक रोशनला लक्ष्य केलं असून त्याच्यावर टीका केली आहे. कंगणाने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. तिचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कंगणा आणि हृतिक रोशन यांच्यात प्रेमसंबंध असल्याची बाब हृतिकने नेहमी नाकारली. तर दुसरीकडे कंगणा राणावतने हे प्रेमप्रकरण असल्याचा दावा केला होता. यावर हृतिकने कंगणा ज्या ई मेल आयडी शी बोलत होती. तो बनावट असल्याचा दावा हृतिकने केला होता. याप्रकरणी त्याने अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला.
Duniya kahan se kahan pahunch gayi magar mera silly ex abhi bhi waheen hai usi modh pe jahan yeh waqt dobara laut ke nahi jane wala … ???? https://t.co/wEMxFCBK3n
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 26, 2021
कंगणाने अनेकदा हृतिक रोशनवर विविध प्रकारचे आरोप केले आहे. तिने बऱ्याच वेळा मुलाखतीत हृतिकचा अपमानही केला आहे. आता पुन्हा एकदा तीने हृतिकवर निशाणा साधलाय. हृतिकला समन्स बजावल्याची बातमीला क्वोट करत कंगणाने एक ट्विट केलं आहे. जग कुठून कुठे पोहचलं, तरी माझा जुना मुर्ख बॉयफ्रेन्ड अजून तिथेच आहे. त्याच वळणावर आहे, ती पुन्हा फिरून येणार नाही, असं कंगणाने म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- दीड वर्षानंतर अंगारकी चतुर्थीचा योग; मात्र, राजुरेश्वराचे मंदिर राहणार बंद
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
- मराठा आरक्षण आंदोलनाचा ३९ वा दिवस; आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा
- ‘तुम्ही नोकरी कसे करता तेच पाहतो’ म्हणून पोलिसांवर चाकुहल्ला; छावणीतील घटना
- …म्हणून पंत मला ‘वसिम भाई’ म्हणतो ; अक्षय पटेलने केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
