Share

महाराष्ट्र पालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर; प्रशासकांचा कार्यकाळ आता बेमुदत

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र महापालिका कायदा, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी कायदा १९६५ मध्ये सुधारणा करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील मुदत संपलेल्या महापालिका, नगरपालिकांमधील प्रशासकांचा कार्यकाळ आता बेमुदत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे त्यातील निवडणुका बेमुदत काळासाठी पुढे ढकलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, मुदत संपलेल्या पालिकांमध्ये ३० एप्रिलपर्यंत प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे तोपर्यंत या पालिकांमध्ये निवडणूका होईल अशी शक्यता होती. मात्र, महाराष्ट्र महापालिका कायदा, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी कायदा १९६५ मध्ये सुधारणा करण्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. त्यानुसार, आता या प्रशासकांची मुदत संपण्यासंबंधीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासकाची नियुक्ती केलेल्या पालिकांची निवडणूक बेमुदत काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे चित्र आहे. यामध्ये औरंगाबाद, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली महापालिकेचाही समावेश आहे.

त्यांना सत्ता येण्याचा विश्वास – फडणवीस
औरंगाबादसारख्या महापालिकांमध्ये सत्ता येण्याचा विश्वास त्यांना नाही, त्यामुळे निवडणूक बेमुदत काळ पुढे ढकलण्याचा हेतू या निमित्ताने, साध्य केला जात आहे, तसचे सत्तापक्षाचे नगरसेवक असलेल्या वॉर्डांमध्ये जादा निधी दिला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

कोरोनाची परिस्थिती पाहून आयोग वेळोवेळी निर्णय – शिंदे
‘सरकारचा असा कोणताही हेतू नाही. निवडणुका कधी घ्याव्यात, हा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. त्यांच्या निर्देशांनुसारच प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. कोरोनाची परिस्थिती पाहून आयोग वेळोवेळी निर्णय घेत आहे. आयोगाने निवडणुका घेण्याचा आदेश दिल्यानंतर तेथे प्रशासक कायम असण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही,’ असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!