Share

‘चंपा’चे ‘ते’ वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे,अजितदादांचा पलटवार

Published On: 

पुणे : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली.

‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.दरम्यान, या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. ‘शरद पवार साहेबांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. देश पातळीवर निर्णय घेतानाही त्यांच्याशी चर्चा केली जाते. त्यामुळेच ‘चंपा’चे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे’, अशा कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फटकारले.

यांची सत्ता असताना सहकाराबाबत पंतप्रधानांशी बोलण्यासाठी पवार आमच्याबरोबर असतील, तर प्रश्न लवकर मार्गी लागेल, असे म्हणारे आज पवारांवर टीका करतात. याला विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणावे लागेल.’समाजात ज्यांना कवडीचीही किंमत नाही ते खालच्या पातळीवर जाऊन बडबड करत आहेत. वक्तव्य करणाऱ्यांनी किमान आपली उंची बघून तरी बोलावं,’ अशा शब्दात अजित पवार यांनी पाटील यांचा समाचार घेतला.

दरम्यान,मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्याने चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मला पवार साहेबांबाबत असं बोलायचं नव्हतं,” अशा शब्दांत पाटील यांनी सारवासारव केली आहे.टीका करून शरद पवार यांचा अवमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शाहांवर बोललेले चालते. तुमचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणतात ते चालते का? असा प्रतिसवाल करत करत चंद्रकात पाटील यांनी आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!