मुंबई : ‘रावसाहेब दानवे हे दानव असून मला निवडणुकीत त्यांनी त्रास दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत डोक्यावरील टोपी काढणार नाही’, असा संकल्प शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलून दाखवला.
श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपुजन समारंभ ग्रामविकास, महसूल, विशेष सहाय्य बंदरे व खार जमिनी विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत येथील पंचायत समिती आवारात आज पार पडला त्यावेळी ते बोलत होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, पंचायत समिती सभापती संगिता शिंदे, सभापती शरद नवले, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.
दरम्यान, ‘रावसाहेब दानवे यांचा पराभव जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत टोपी काढणार नाही, असा संकल्प केला होता. पण, काही दिवसांनी परिस्थिती उलटी झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावसाहेब दानवे निवडून आले पाहिजे, असं सांगितलं आणि टोपीचा मुक्काम आणखी वाढला. मी काही टोप्या घालण्याचे काम करत नाही, त्यामुळे टोपीचा मुक्काम पाच वर्ष वाढला आहे’, असं सांगताच सभागृहात एकच हशा पिकली.
‘आता ज्यांच्या विरोधात टोपी घातली. त्यांच्या प्रचाराच काम करावे लागले. त्यावेळी दिल्लीतील मोठ्या नेत्याने आम्हाला बोलावून घेतले होते आणि त्यांनी दानवे यांच्या प्रचाराबद्दल सांगितले. पण, मी त्यांना सांगितले, हा माणूस जो आहे तो चकवा आहे, तो काय आमच्या मागे लागला तर पाठलाग काही सोडणार नाही. आज यांना निवडून दिले तर उद्या ते आमच्यामागे कोयता घेऊन मागे लागतील, ते दानवे नाही दानव आहे. मी त्यांना माझ्या मतदारसंघात 1 लाखांची लीड दिली. पण, शेवटी जे करायचे तेच दानवेंनी केलं. अर्जुन खोतकर यांच्या मागे लागून बळी घेतला, असा किस्साही सत्तार यांनी सांगितला.
महत्वाच्या बातम्या
- राधाकृष्ण विखे पाटील अनुभवी नेते, त्यांनी शिवसेनेत यावे; अब्दुल सत्तार यांच्या ऑफरने राजकीय चर्चांना उधाण!
- ‘मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर निवडुन येईल’
- महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता, सामना मधून भाजपवर प्रहार !
- बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये वाढीव वीज बिल विरोधात आंदोलन
- आता येणारी कोरोनाची दुसरी लाट नसून त्सुनामी असेल – उद्धव ठाकरे


