मुंबई : मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे.
लव्ह जिहाद किंवा रोमियो जिहाद हे मुस्लिम पुरुषांनी मुस्लिम नसलेल्या मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रेमाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्यातला लावण्याचा प्रकार समजला जातो. प्रेमाचा ढोंगीपणा आहे. भारतामध्ये केरळमध्ये प्रथम आणि नंतर कर्नाटकमध्ये २००९ मध्ये या संकल्पनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. हा शब्द भारताच्या संदर्भात वापरला जातो पण ब्रिटनसारख्या देशांमध्येही अशाच प्रकारच्या कृती झाल्या आहेत.
भाजपशासित राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. अशातच हिंदुत्ववादाचं समर्थन करणारी शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत असताना राज्यात हा कायदा लावणार का यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेला पेचात टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोन पक्ष लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला समर्थन देण्यास अनुकूल नसतील. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार हे महत्वाचे आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ‘इतर राज्यात कोणता कायदा कसं करतायत हे पाहायचं आहे. खासकरून बिहारमध्ये नितीशकुमार लव्ह जिहाद संदर्भात कोणत्या प्रकारचा कायदा करतायत हे बघून त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू.’ असं म्हणत त्यांनी भाजपचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
नितीशकुमार हिंदुत्व पुरस्कारवादी नसल्याचा आरोप याआधी देखील शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळेच संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्वाची मानली जात आहे. पुढे ते म्हणाले, ‘नितीशकुमार भाजपच्या सहकार्याने मुख्यमंत्री झालेले आहेत. ते सरकार भाजप चालवतंय. त्यामुळे नितीशकुमार आणि भाजप जे कायदा करतील त्या कायद्याचा अभ्यास करू आणि मग बोलू. बिहारमध्ये भाजपनं लव्ह जिहादबाबत आदर्श, चांगला कायदा बनवावा, त्यानंतर आम्ही महाराष्ट्रात बघू.’ असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर निवडुन येईल’
- बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये वाढीव वीज बिल विरोधात आंदोलन
- ‘शरद पवार अभ्यास नसलेले छोटे नेते’ : चंद्रकांत पाटील
- निवडणुकीआधीच तृणमूलचे पाच खासदार भाजपाच्या वाटेवर? भाजप खासदाराचा दावा !
- ‘तोरबाज’ चित्रपटात संजय दत्त दिसणार ‘मसीहा’च्या भूमिकेत…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

