Share

IND vs AUS : पहिल्या कसोटी सामन्यात रोहित-इशांत खेळणार का? अजूनही संभ्रम कायम

Published On: 

मुंबई : फिटनेसवर प्रश्नचिन्ह असल्याने उपकर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. यंदा युएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहितच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही मालिकांसाठी निवड झाली नव्हती. मात्र, तो कसोटी मालिकेपूर्वी पूर्णपणे फिट होण्याची शक्यता असल्याने त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

स्वतः रोहितने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे की, त्याची दुखापत आता ठीक आहे. रोहित लवकरच कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.रोहितने आपल्या हॅमस्ट्रिंगच्या सद्यपरिस्थितीविषयी माहिती देताना सांगितले, हॅमस्ट्रिंग सध्या ठीक आहे. त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. डॉक्टर्स हॅमस्ट्रिंग मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कसोटी मालिका प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे, पूर्णपणे तंदुरूस्त होऊनच मी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

दरम्यान, रोहितप्रमाणेच टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मादेखील सध्या दुखापतीतून सावरतोय. दोघांचीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत. परंतु या खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळण्यासाठी पुढील चार ते पाच दिवसात भारतातून ऑस्ट्रेलियाला रवाना व्हावे लागेल. परंतु त्यांना त्यांची फिटनेस ट्रेनिंग पूर्ण करायला अजून किती वेळ लागेल, हे सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू पहिल्या कसोटी सामन्यात खेळतील किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री याबाबत म्हणाले की, कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने बनवलेले क्वारन्टिनसंबंधित नियम आणि सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही खेळाडूंना लवकरात लवकर ऑस्ट्रेलियात दाखल व्हावे लागेल. त्यांना जास्त दिवस भारतात राहावे लागले तर आपल्या अडचणी वाढू शकतात. रोहित शर्माची NCA मध्ये जोरदार फिटनेस ट्रेनिंग सुरु आहे, असे शास्त्री यांनी ईएसपीएन-क्रिकइन्फोशी बोलत असताना सांगितले.

शात्री म्हणाले की, त्याला (रोहितला) जास्त दिवस एनसीएमध्ये थांबावं लागलं तर परिस्थिती आपल्या हातात राहणार नाही. ट्रेनिंग पूर्ण करुन तो ऑस्ट्रेलियात येणार. त्यानंतर तो क्वारन्टिन कालावधी पूर्ण करणार, आणि मग तो कसोटी मालिका खेळण्यासाठी उपलब्ध होईल. असा परिस्थितीत काहिही सांगणं अवघड आहे.

रोहित शर्मा कसोटी मालिकेच्या दृष्टीने एनसीएमध्ये जोरदार सराव करतोय. “मी कसोटी मालिकेत कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे”, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने पीटीआयला दिली आहे. रोहितने मागील 5 कसोटीत टीम इंडियासाठी सलामी दिली आहे. रोहित म्हणाला की, “टीम मॅनेजमेंट मला ज्या क्रमांकवर खेळवण्यात तयार आहे, त्या क्रमांकावर मी खेळेन. टीम मॅनेजमेंट माझ्या सलामीवीरच्या भूमिकेत बदल करणार की नाही, याबाबत मला माहिती नाही”, असं रोहितने म्हटलं.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!