मुंबई: राज्यातील मविआ मंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांवर होत असलेल्या ईडी कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते रोज ईडीच्या माध्यमातून आमच्यावर मिसाईल सोडताहेत असे म्हटले. यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“उचलली जीभ लावली टाळ्याला. मागचा-पुढचा काहीही विचार न करता बोलणं विश्वप्रवक्ते संजय राऊत यांचे सध्या तसंच चाललंय. आता काय तर म्हणे दिल्लीतही पुतीन आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रावर मिसाइल हल्ले होतात. भारत आपला देश आहे. आणि महाराष्ट्र अजूनही देशातच आहे. सांगा रे त्यांना कुणी.”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान आम्ही पंतप्रधान कार्यालयात आणि ईडीकडे सर्व पुरावे दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयातून मला पोचपावती मिळाली आहे. मात्र, आमच्या पुराव्यांकडे कुणाचं लक्ष नाही. केवळ सिलेक्टेड कारवाई सुरू असून चुकीच्या माहितीवर आधारीत काही गोष्टी प्रसारीत केल्या जात आहेत. हळूहळू त्या गोष्टी बाहेर येतील. ही आमच्याविरोधातील बदनामीची मोहीम आहे. हीच मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “CBI चौकशी झाली तर ‘मोठे साहेब’…”; भाजपचा शरद पवारांना इशारा
- … आणि बीसीसीआय अध्यक्ष ‘दादा’ ही पुष्पाच्या गाण्यावर थिरकला; VIDEO पहिला का?
- ‘…ते आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत” – राऊतांची फटकेबाजी
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ३१ मार्चपासून निर्बंधमुक्त देश
- “..यालाच मोदी सरकारची मुत्सद्देगिरी म्हणायचे काय ?”- संजय राऊत


