Share

… आणि बीसीसीआय अध्यक्ष ‘दादा’ ही पुष्पाच्या गाण्यावर थिरकला; VIDEO पाहिलात का?

Published On: 

मुंबई: अल्लू अर्जुन आणि त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ गेल्या काही महिन्याभरापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, विराट कोहली आणि शाकिब अल हसन यांच्यानंतर आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही या क्रेझ मध्ये सामील झाला आहे. दादाने नुकतेच ‘श्रीवल्ली’ गाण्याची स्टेप केली आहे आणि त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

”पुष्पा’ मधील हिट श्रीवल्ली गाण्यावर अनेक भारतीय क्रिकेटपटू थिरकताना आपण याआधीच पाहिले आहे. आता यात दादाचेही नाव सामील झाले आहे. दादागिरी अनलिमिटेडच्या सेटवर, शोचा होस्ट सौरव गांगुली (sourav ganguly) एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये पुष्पा गाण्यावर तरुण स्पर्धकांसोबत नाचताना दिसत आहे. यासोबतच त्याने पुष्पा चित्रपटातील आयकॉनिक ‘झुकेगा नई’ ची ऍक्शन सुद्धा केली आहे.

आयपीएल सुरू होण्यापूर्वी, सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी नुकत्याच केलेल्या फोटोशूट दरम्यान मजेदार सत्राचा आनंद लुटला. तिथे गोलंदाजी प्रशिक्षक डेल स्टेननेही ‘पुष्पा’ मधील अल्लू अर्जुनची (allu arjun) आयकॉनिक ऍक्शन केली. याचे क्रेझ बघता आयपीएल सुरु झाल्यावर अनेक खेळाडू सेलिब्रेट करताना अल्लू अर्जुनची आयकॉनिक ऍक्शन करताना दिसू शकतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!