मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर चाकणकर यांच्यावर ईडी कारवाई झाल्यानंतर मविआ नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यावरच काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकार दडपशाहीचं राजकारण करत असून विरोधकांकडे बोलायला मुद्दे नाहीत. विरोधक खोटे पुरावे सादर करते असल्याचे म्हटले. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे देखील पेन ड्राईव्हचे बॉम्ब फुसके निघाले, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता. यावरच आता भाजपने प्रत्युत्तर देत थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar ) यांना निशाण्यावर धरले आहे.
“आदरणीय सुप्रिया सुळे जी, पेनड्राईव्ह बॉम्बला फुसके म्हणण्यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा तरी विचार करायचा होता. पेनड्राईव्ह बद्दल सांगायचं झालं तर, प्रवीण चव्हाणने कुण्यातरी मोठ्या साहेबांचा उल्लेख केला आहे. CBI चौकशी झाली तर ‘मोठे साहेब’ कोण? हे देखील कळेल!”, असा इशारा भाजपने राष्ट्रवादीला दिला आहे.
आदरणीय @supriya_sule जी, पेनड्राईव्ह बॉम्बला फुसके म्हणण्यापूर्वी @AnilDeshmukhNCP आणि @nawabmalikncp यांचा तरी विचार करायचा होता.
पेनड्राईव्ह बद्दल सांगायचं झालं तर,प्रवीण चव्हाणने कुण्यातरी मोठ्या साहेबांचा उल्लेख केला आहे.
CBI चौकशी झाली तर 'मोठे साहेब' कोण? हे देखील कळेल! pic.twitter.com/1jqw3i6E0D
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 23, 2022
दरम्यान ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- क्रिकेट जगत आश्चर्यात! बांगलादेशकडून दक्षिण आफ्रिका संघाचा पत्ता साफ; ऐतिहासिक मालिकाविजय
- एअरपोर्टवर ‘या’ तरुणीने कार्तिक आर्यनला असा केला प्रपोज! पहा व्हिडिओ
- “जयश्री जाधव यांना भाजपकडून लढण्यास सांगा, अजूनही…” – चंद्रकांत पाटील
- शिवीगाळ प्रकरणी सलमान खानला पुन्हा चढावी लागणार कोर्टाची पायरी
- रुपाली चाकणकरांनी दिला राष्ट्रवादी महिला अध्यक्षपदाचा राजीनामा!


