🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विविध सामाजिक संस्था देखील आवाहन करत आहेत.
यामुळे, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली असून रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद देखील करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये केवळ तीन दिवसच पुरेल इतका लसींचा साठा असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. मुंबई महापालिकेसह राज्य सरकारने देखील अतिरिक्त लसींच्या साठ्याची मागणी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील वाढत कोरोनाचा धोका बघता २५ वर्षांपुढील व्यक्तींना लसीकरणाची परवानगी देण्यात यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लसीकरण मोहीम मात्र जोरात सुरू आहे. लसीकरणात महाराष्ट्राची कामगिरीही कौतुकास्पद आहे, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र्राचा कौतुक होत असलं तरी लसींचा साथ नसल्याने लसीकरणामध्ये अडथळा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता शिवभोजन थाळी देखील मिळणार पार्सल
- मुंबईत भाजपचा शिवसेनेला धक्का; ‘या’ माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश
- बच्चू कडूंचा रौद्रावतार; रुग्णालय मेसमधील स्वयंपाकीच्या लगावली कानशिलात !
- दोन दिवसांचा लॉकडाऊन सांगून तुम्ही…फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
- मोठी बातमी : MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार !


