Share

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून चंदिगढच्या महिला पोलिसांचे कौतूक!

Published On: 

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चंदिगढ महिला वाहतूक पोलिसाचे कौतूक केले आहे. सध्या या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महिला वाहतूक पोलीस कर्मचारी छोट्या बाळाला कडेवर घेऊन रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पाहतांना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यातील महिला पोलीस अधिकारी आई आणि पोलीस अशा दोन्ही भूमीका पार पाडताना दिसत आहे.

हा व्हिडीओ पोस्ट करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहिले की, छत्रपती शिवरायांच्या काळात ‘हिरकणी’ गवळण आपल्या तान्हुल्यासाठी रायगडावरील कठीण कडा उतरली होती. आजच्या समाजातही कर्तव्य बजावून मातृत्व जपणारी ‘हिरकणी’ बघितल्यावर अभिमानाने उर भरून येतो! चंदीगडमध्ये बाळाला कडेवर घेऊन ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या या पोलीस महिलेला माझा त्रिवार सलाम!’

महिला दिनाच्या आधी हा व्हिडीओ व्हायरल होताेय. यात राज्याच्या गृहमंत्र्यांनही या वाहतूक पालिसाचे कौतूक केले आहे. राज्यातही अशा अनेक ‘हिरकणी’ संकटांचा सामना करत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्याही खांद्यावर ही कौतूकाची थाप पडावी.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!