Share

‘जोर से छाप, टीएमसी साफ’, मोदींचा बंगालमध्ये नारा

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विविध पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केले आहेत. पंतप्रधान मोदी यांची आज रविवारी बंगालमध्ये पहिली प्रचार सभा पार पडली. या सभेसाठी प्रचंड गर्दी जमली होती. ब्रिगेड परेड ग्राऊंडमधून त्यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेची फसवणूक केलीय. पण आता काळजी करू नका. येत्या निवडणुकीत तुम्हाला परिवर्तन करण्याची संधी आहे. तेव्हा यावेळी आपण ‘जोर से छाप, टीएमसी साफ’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतांवर निशाना साधला.

मोदी म्हणाले, तृणमुल हे काँग्रेसचेच गोत्र आहे. तर भाजपच्या मुळात बंगालचा सुंगध आहे. लोकसभा निवडणुकीत कमळाचे बटन दाबून कमाल केली. आताही तीच वेळ आली आहे. एका मताची किंमत काय आहे ती आपण काश्मीरपासून अयोध्येपर्यंत पाहिली आहे. यावेळेसही आपण कमळाचे बटन दाबून टीएमसीचा सुपडा साफ करा, असे आवाहन मोदींनी केलं.

तुमचा माझ्यावर एवढा राग का?
मोदी म्हणाले, ममता बँनर्जींनी कधी मला रावण म्हटले तर कधी मला दानव. मला यानिमित्ताने विचारायच आहे की, दीदी माझ्यावर तुमचा एवढा राग का? बंगालमध्ये आता कमळ फुलणार आहे. कारण आपण तसा चिखल केलाय. दीदी. मी तुम्हाला खूप वर्षांपासून ओळखतोय. आता ही दीदी पहिली दीदी नाही जिने डाव्या संघटनांविरुद्ध मोर्चा काढला होता, अशी टीका मोदींनी केली.

बंगालमध्ये आता हटवादी भूमिका संपेल, असं म्हणत बंगालमध्ये परिवर्तन होणारच, असा विश्वास सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर बंगालकडून जे जे हिसकावले गेले, ते ते पुन्हा मिळवून देऊ. तसंच ‘सिटी ऑफ जॉय’ अशी ओळख असलेल्या पश्चिम बंगालला ‘सिटी ऑफ फ्युचर’ बनवू, असं वचन मोदींनी बंगालच्या जनतेला दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!