Share

महाराष्ट्रामुळेचं देशातील विरोधकांना बळ मिळालं : शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : झारखंडच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला चांगलाच दणका बसला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी इतर राज्यातही संधी मिळाल्यावर जनता भाजपला धडा शिकवेल असा टोला भाजपला लगावला आहे. तर महाराष्ट्रातील विरोधकांच्या ठाम भूमिकेमुळे देशातील विरोधकांना प्रेरणा मिळाली, असेही पवार म्हणाले. आज पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी झारखंडच्या निकालावर भाष्य केले.

ते म्हणाले की, जनतेने भाजपला नाकारलं आहे. त्यामुळे झारखंडच्या जनतेचे कौतुक करतो. इतर राज्यातही संधी मिळाल्यावर जनता भाजपला धडा शिकवेल. आता प्रत्येक राज्यात झारखंड सारखी परिस्थिती दिसेल. 5 व्या राज्यात मोदी सरकारला जनतेने दुर ठेवले आहे. जनता भाजपला नाकारत आहे. तसेच NRC आणि CAA आणून सरकार स्वतःचं अपयश झाकण्यासाठीचं समाजात धार्मिक अंतर वाढण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप सरकार सर्व पातळ्यांवर अयशस्वी ठरले आहे.

NRCबाबत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य हे गोंधळात टाकणार आहे. कारण भाषणात मोदी NRCबाबत कोणतीची हालचाल सुरु नसल्याचं बोलत आहेत. तर दुसरीकडे संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा NRC हे विधेयक आणणार असल्याचं बोलत आहेत. त्यामुळे या दोघांचीही विधान संभ्रमात टाकणारी आहेत, असेही पवार म्हणाले. तर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या ( CAA) विरोधात जनतेने शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर रंगलेल्या सत्ता संघर्षात विरोधकांनी एकत्र येत बलाढ्य भाजपला शह देत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. यावेळी राज्यातील विरोधकांनी किमान समान कार्यक्रम ठरवत आपल्या भूमिका बाजूला ठेवून सत्तास्थापन करत काम करण्याची तयारी दाखवली. हाच धागा पकडत शरद पवारांनी महाराष्ट्रामुळेचं देशातील विरोधकांना बळ मिळालं, असे विधान केले.

 महत्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1209080904766779394?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209095584100966406?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!