मुंबई : राज्यात सद्या आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असतानाच ओबीसी समाज देखील आरक्षण अबाधित राहून स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर पार पडाव्यात या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आहे.
याच मुद्द्यावरून भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीस सरकारच्या काळातील परिस्थितीचा दाखल देऊन एकनाथ खडसे व महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ओबीसींना प्राधान्य देण्याचे काम झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.
ओबीसींबद्दल भाजपची भूमिका राज्यातील सर्वांना माहिती आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे आहेत त्यामुळे ओबीसी म्हणजे खडसे नव्हेत. ओबीसी समाजातील अनेक लोकांना सत्तेतील आणि पक्षातील सन्मानाची पदे दिली गेली आहेत, त्याचा विसर खडसेंना पडला असावा, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचे काम आणि टीका करण्याचे काम एकनाथ खडसेंना दिले गेले असावे. एकनाथ खडसेंनी राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला देखील दरेकरांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- दुर्देवाने राज्य सरकार कुठल्याच विषयात गंभीर नाही – प्रविण दरेकर
- हौशे-गवशेच पक्ष सोडून जातील ; महाजनांचा खडसेंना टोला
- पंचनाम्याचे दुस-यांदा नाटक कशासाठी..? शेतकऱ्यांना सरसकट मदत करा-भाजपा
- खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा; दरेकरांचा घणाघात
- काँग्रेसला नाराजीचा मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

