Share

खडसेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा; दरेकरांचा घणाघात

Published On: 

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी चार दशकांचा भाजपसोबत असलेला संसार मोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांना महत्वाचं मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सद्या फक्त राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी मिळणार यावर जवळजवळ निश्चिती असतानाच आता भाजप आणि खडसेंमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा, असा हल्ला भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना देवेंद्र फडणवीसांना व्हिलन ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, आता त्यांनी हे थांबवावे, असं दरेकर म्हणाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर एकनाथ खडसे हे नाराज होते. सुमारे वर्षभर अलिप्त राहायला लागल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर खडसेंनी आता भाजपवर टीका करण्यास सुरुवाट केल्यानंतर भाजप नेते देखील जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.

उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल

आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली. जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!