मुंबई : नुकत्याच राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकींच्या तोफा थंडावल्या आहेत. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत.
राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील
23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी
31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी
4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी
15 जानेवारी मतदान
18 जानेवारी मतमोजणी
दरम्यान, एकतीस डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल चार जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसंच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 4 जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल आणि 15 जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रवाशांसाठी महत्वाची सूचना ! ‘या’ रेल्वे गाड्याने प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक एकदा तपासून बघा
- मराठी तरुणांना रोजगाराची संधी, ठाकरे सरकारच्या ‘या’ नव्या योजनेतून ‘असे’ मिळवा अनुदान !
- राजस्थानमध्ये पुन्हा राजकीय उलथापालथ; मित्रपक्षाने सरकारचा पाठिंबा काढला
- ‘त्या’ खासदारांचा काय अभ्यास? भुजबळांचा उदयनराजेंना अप्रत्यक्ष टोला
- शरद पवारांच्या नेतृत्वाचा युपीएला निश्चितच फायदा होईल – पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

