🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या काळामध्ये बंद असलेली रेल्वे वाहतूक सुरु झाल्यानंतर आता रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांडून गाड्यांचे बुकिंग आणि प्रवास सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून विशेष गाड्यंचे द्खील आयोजन केले जात आहे. 12 डिसेंबरपासून या विशेष गाड्यांचे बुकिंग सुरु होणार आहे. त्याच बरोबर पश्चिम रेल्वेने दोन साप्ताहिक विशेष एक्सप्रेस’ गाड्यांचे वेळापत्रक बदलले असल्याची घोषणा देखील केली आहे.
भारतीय रेल्वेने काही गाड्यांचे वेळापत्रक बदलून आणखी काही नवीन गाड्या सुरू केल्या आहेत. पश्चिम रेल्वेने ‘वलसाड-मुजफ्फरपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस’ आणि ‘वांद्रे टर्मिनस-गोरखपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस’चे वेळापत्रक बदलले आहे. याव्यतिरिक्त, पश्चिम रेल्वेने ओखा-अर्नाकुलम ते ओखा-रामेश्वरम दरम्यान विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. 12 डिसेंबरपासून या रेल्वे तिकिटांचे बुकिंग सुरू होणार आहे.
ट्रेन क्रमांक 05068 वांद्रे टर्मिनल-गोरखपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस : ट्रेन क्रमांक 05068 वांद्रे टर्मिनस-गोरखपूर स्पेशल एक्सप्रेस 18 डिसेंबर 2020 पासून वांद्रे टर्मिनस येथून, दर शुक्रवारी 00.20 वाजता सुटून, दुसर्या दिवशी गोरखपूरला 15.05 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 05067 गोरखपूर-वांद्रे टर्मिनस 16 डिसेंबर 2020 पासून, दर बुधवारी 05.30 वाजता गोरखपूरहून सुटेल आणि दुसर्या दिवशी वांद्रे टर्मिनसला 17.30 वाजता पोहोचेल. पश्चिम रेल्वेच्या सर्व थांब्यांसाठी रेल्वेच्या वेळेत सुधारणा करण्यात आली आहे. या ट्रेन पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, वापी, भेस्तान आणि नंदुरबार या स्थानकांवर थांबतील
ट्रेन क्रमांक 09051/09052 वलसाड-मुजफ्फरपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस : ट्रेन क्रमांक 09051 वलसाड-मुजफ्फरपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस, 12 डिसेंबर 2020पासून, दर शनिवारी 22.15 वाजता वलसाडहून सुटेल आणि तिसर्या दिवशी 06.50 वाजता मुझफ्फरपूरला पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09052, 14 डिसेंबर 2020पासून दर सोमवारी मुझफ्फरपूर येथून 20.10 वाजता सुटेल व तिसर्या दिवशी वलसाड येथे 07.10 वाजता पोहोचेल. या ट्रेनला जौनपूर जंक्शन येथे अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे.
उत्तर रेल्वेने असे सांगितले आहे की, प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेचे आगमन / प्रस्थान / थांबा इत्यादी संदर्भात माहितीसाठी 139वर फोन करावा. तसेच, रेल्वेची नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम (एनटीईएस) आणि भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या किंवा जवळच्या रेल्वे आरक्षण काउंटर / रेल्वे स्टेशनवर अधिकृत कर्मचार्यांकडून याबाबत योग्य माहिती मिळवावी. प्रवाशांसाठी महत्वाची सूचना देण्यात आली आहे या रेल्वे गाड्याने प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक एकदा तपासून बघा त्याच बरोबर सणांच्या निमित्ताने काही विशेष गाड्यांचे आयोजन क्र्नाय्त आले आहे.
ट्रेन क्रमांक 06337/06338 ओखा-अर्नाकुलम-ओखा महोत्सव स्पेशल (द्वि-साप्ताहिक) : ट्रेन क्रमांक 06337/06338 ओखा-अर्नाकुलम द्वि-साप्ताहिक विशेष 14 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2021 दर सोमवारी आणि शनिवारी ओखा ते सुबर 06.45 येथे निघेल. त्याच दिवशी सकाळी 11.00 वाजता राजकोट येथे पोहोचेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.55 वाजता अर्नाकुलमला पोहोचेल. तर, परतीच्या वेळी ट्रेन क्रमांक 06388 अर्नाकुलम-ओखा स्पेशल ही गाडी अर्नाकुलमहून 11 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020 दरम्यान दुपारी 20.25 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी सकाळी 11.19 वाजता राजकोटहून निघेल आणि सायंकाळी 16.40 वाजता ओखाला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 06734/06733 ओखा-रामेश्वरम-ओखा महोत्सव स्पेशल (द्वि-साप्ताहिक) : ट्रेन क्रमांक 06734 ओखा-रामेश्वरम महोत्सव साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवारी, 15 डिसेंबर 2020 ते 29 डिसेंबर 2020 दरम्यान ओखा येथून सुबर येथे सकाळी 08.40 वाजता सुटेल. त्याच दुपारी 13.00 वाजता राजकोट, तर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 19.15 वाजता रामेश्वरमला पोहोचेल. परतीच्या वेळी ट्रेन क्रमांक 06733 रामेश्वरम-ओखा फेस्टिव्हल स्पेशल ही गाडी 11 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2020 दरम्यान दर शुक्रवारी रात्री 22.10 वाजता रामेश्वरमहून सुटेल आणि चौथ्या दिवशी पहाटे 05.15 वाजता राजकोट, तर सकाळी 10.20 वाजता ओखाला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 06337 ओखा-अर्नाकुलम आणि ट्रेन क्रमांक 06734 ओखा-रामेश्वरम फेस्टिव्हल विशेष गाड्यांचे आरक्षण 12 डिसेंबरपासून रेल्वे आरक्षण काउंटर व आयआरसीटीसी येथे सुरू होईल. वरील सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित ठेवल्या जातील.
महत्वाच्या बातम्या
- काय सांगताय? २४ तासांत होणार कोरोनाचा नाश!, प्रभावी औषध शोधण्यास शास्त्रज्ञांना यश
- राहुल गांधींविरोधात रचलं जातंय मोठं षडयंत्र? जाणून घ्या नेमका काय आहे प्रकरण …
- रावसाहेब दानवे यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करा; काँग्रेसचा हल्लाबोल
- …अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांची मुंबईकरांना ताकीद
- शेतकरी संघटनांशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारची दारे सदैव खुली आहेत – नरेंद्र सिंह तोमर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

