बीड: केरळ येथे राष्ट्रीय टेनिस-व्होलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा २८ व २९ मार्च रोजी कासारगोड येथील उदमा या ठिकाणी घेण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या युथ गट मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे यात बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील जिल्हापरिषद शाळेच्या मुला-मुलींची खेळी लक्षणीय ठरली आहे.
महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व निकिता थावरे करत होती. पहिल्या सामन्यात आंध्रप्रदेशला हरवले, दुसऱ्या सामन्यात कर्नाटकला हरवले आणि तिसऱ्या सामन्यात तामिळनाडूला हरवून महाराष्ट्राच्या संघाने अंतिम टप्पा गाठला. छत्तीसगड सोबत अंतिम सामना चांगलाच रंगला होता, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे असल्याने सामना अत्यंत अटीतटीचा झाला आणि अखेर महाराष्ट्राने २-१ ने बाजी मारत विजेते पद पटकावले.
या संघातील सर्व मुले माजलगाव येथील ग्रामीण भागातून पुढे आली होती आणि त्यांचे प्रशिक्षण करण्यासाठी राज सोनपसारे यांची निवड करण्यात आली होती. या सर्व मुला-मुलींवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्नांच्या रंगाची उधळण करून खऱ्या अर्थाने धुलीवंदन घडवून आणणाऱ्या आदर्श गुरूंचे व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन, येथील ग्रामस्थ करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊनमध्ये नियमांचे काटेकोर पालन करुन रुग्ण संख्या नियंत्रणात आणणार : जिल्हाधिकारी
- मुंबईला जाण्यास नकार देणे पडले १४ एस.टी. कर्मचाऱ्यांना महागात
- लॉकडाऊन काळात मजुरांना घरी पोहोचवणाऱ्या एसटी चालकांच्या पदरी निराशा
- सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्याकडून परभणीतील कोविड रुग्णांची विचारपूस
- …म्हणून शरद पवारांना आजच रुग्णालयात दाखल करावं लागलं; नवाब मलिकांनी दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

