मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरुन महाविकासआघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले, तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही,’ अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. ते पनवेलमधील शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते. त्यांनी आज उरण, पनवेल आणि खारघर याठिकाणी शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठका घेतल्या आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार होत आहेत. नुकतेच मेळघाटामध्ये एका महिला वनाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याला कोण जबाबदार आहे? महाविकास आघाडीचे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. संवेदना नसलेल्या या भ्रष्ट सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.’
या सरकारचे भीषण स्वरूप भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचवले पाहिजे, असं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची अवस्था तर ‘न घर का न घाट का’, असं म्हणत टोला लगावला.
तसेच चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. पण हे सरकार बेभान होऊन केवळ आपले गुन्हे आणि भ्रष्टाचार लपविण्यामागे व्यस्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे जरा डोळे उघडून हा आलेख बघा म्हणजे तुम्हाला राज्यावर येणाऱ्या मोठ्या संकटाची जाणीव होईल.’
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यात शनिवारी सायंकाळपर्यंत तरी लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
