🕒 1 min read
मुंबई: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिल्या कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ माजली. रावळपिंडीच्या पीचवर टीका करण्यात आली. आयसीसीने याची दखल घेत डी मेरीट पॉईंट्सही दिले. यानंतर अनेक पाकिस्तानी माजी खेळाडूंनी नाराजी दर्शवली आहे. कसोटी सामन्यातील खराब खेळपट्टीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद पीसीबीवर चांगलाच संतापला होता. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज दानिश कनेरियानंतर आता आकिब जावेदने पीसीबी प्रमुख रमीझ राजाला मोठा सल्ला दिला आहे.
PCB वर भडकलेल्या जावेद (Aaqib javed) यांनी सांगितले “रमीज राजासाहेब म्हणतात की आम्हाला वेळ लागतो, आम्ही ऑस्ट्रेलियातून तज्ञांना बोलावतो, मातीही येत आहे. माझा मुद्दा असा आहे की ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यासाठी तुम्ही त्यांना त्यांची माती येथे द्याल. पीचमध्ये वेरिएशन आण्यासाठी सगळी चर्चा होत आहे. माती प्रशिक्षणासाठी असते, कसोटी सामने जिंकण्यासाठी नाही. जर तुम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल, तर तुम्ही मुंबईतील लोकांकडे जा, ते कसे टर्निंग पिच बनवतात. श्रीलंकेला जा ते कसे पीच बनवतात ते बघा.” जावेद यांनी रमीझ राजांवर (ramiz raja) घणाघात केला आहे.
आकिब जावेदने यावेळी पाकिस्तान संघात दोन स्पिनर खेळवण्यात आल्याबद्दलही वक्तव्य केले आहे. “पाकिस्तानच्या पीचवर स्पिन होत नाही, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे. ऑस्ट्रेलियाला हरवायचे असेल तर तुम्ही ते करायला हवे होते, तुमच्याकडे दोन फिरकीपटू आहेत आणि तुम्ही स्पिन होईल अशी पीच बनवा. तुमच्या पीचवर स्पिनच होत नसेल, तर फिरकीपटूंचा उपयोग काय? रवींद्र जडेजाने नऊ विकेट घेतल्या असतील तर त्या पीचमुळे. तुम्ही अशी पीच बनवली पाहिजे जी टर्न आणि रिव्हर्स स्विंग मिळवेल जी तुमची ताकद आहे.”
महत्वाच्या बातम्या
- “देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात”, गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान
- अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कंपनीविरोधात ‘अर्शद वारसी’ असं काय बोलला की….
- कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांच्या स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणार – अजित पवार
- VIDEO: धोनी पुन्हा मेंटॉरच्या भूमिकेत ‘या’ अंडर १९ स्टारला शिकवत आहे ‘हेलिकॉप्टर शॉट’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
