मुंबई: केंद्र सरकारने कर कपात केल्याने देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डीझेलच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले. यावरून भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
राज्यात पेट्रोल-डिझेलच्या मूल्यवर्धित करात कपात करण्यात आली होती. त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र महाराष्ट्राने मागेच गॅसवरील टॅक्स कमी केला होता. तसेच कोणताही नवीन टॅक्स लावला नव्हता. गॅसवरील कर कमी केल्यामुळे राज्याचा एक हजार कोटींचा महसूल बुडाला होता. तर मूल्यवर्धित कर कमी केल्यामुळे दोन हजार ४०० कोटींचा महसूल सोडावा लागला असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात विविध घडामोडींबाबत पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की राज्यात पेट्रोल-डिझेलच्या मूल्यवर्धित करात कपात करण्यात आली होती. त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप झाले. pic.twitter.com/uIqmR3gIth
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 26, 2022
याचाच अर्थ राज्याचे जवळपास साडे तीन हजार कोटींचा महसूल सोडून जनतेला दिलासा दिला आहे. तरीही विरोधक सतत आरोप करुन यात आणखी कपात करण्यासाठी सांगत आहेत. मात्र राज्य सरकारला जेवढे शक्य तेवढे करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- स्थानिक स्वराज्य संस्थेमधील OBC आरक्षण अजून गेलेले नाही – हरिभाऊ राठोड
- “सर्वज्ञानी माणसाने इतके अस्वस्थ होण्याची…”, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा
- IPL 2022 LSG vs RCB : कार्तिक रॉक्स, राहुल शॉक्स..! ‘तो’ षटकार पाहून विराटनं तर सीटवरून मारली उडी; पाहा VIDEO!
- आम्ही सर्व पक्ष आणि सरकार अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे – संजय राऊत
- “ठिणगी कोणाची? जळतंय कोण? शिवसेना संपवण्यासाठीच राष्ट्रवादीचा जन्म” ; खासदार सुजय विखे पाटील


