मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्स संघाने पंजाब किंग्सच्या संघाचा ६ गडी राखुन दणदणीत विजय मिळवत दमदार पुनरागमन केले आहे. पंजाब किंग्सने दिलेले १९६ धावांचे कठिण लक्ष्य चार गडी गमावत १९व्या षटकातच पार केले. धावांचा पाठलाग करताना ९२ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
दिल्ली कॅपीटल्सने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पंजाब किंग्सचे सलामीवीर के एल राहुल आणि मंयक अग्रवाल यांनी १२ षटकांत १२२ धावांची सलामी देत प्रथम गोलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरवला. मात्र दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजानी पुनरागमन करत पंजाबच्या संघाला २० षटकात १९५ धावांवर रोखले. पंजाबकडून मंयक अग्रवालने अवघ्या ३६ चेंडुत ७ चौकार आणि ४ षटकारासह ६९ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार के एल राहुने (६१) चांगली साथ दिली.
सामन्याच्या दुसऱ्या डावात दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज सुरुवात केली. दोघांनी सुरुवातीपासुनच आक्रमक पवित्रा धारण करत ५ षटकांतच अर्धशतकी सलामी दिली. सलामीवीर पृथ्वी शॉ ३२ धावांवर बाद झाल्यानंतर शिखर धवनने स्टिव्ह स्मिथ(९), कर्णधार रिषभ पंत(१५) यांच्यासोबत भागीदारी करत विजय खेचुन आणला. शिखर धवन बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि मार्कोस स्टॉयनीस यांनी विजय आवाक्यात आणला. पंत बाद झाल्यानंतर स्टॉयनीसने ललीत यादवसोबत नाबाद भागिदारी करत दिल्लीला ६ गडी राखुन विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ राज्यांमधून महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास RTPCR चाचणी बंधनकारक !
- आरसीबीने केकेआरची शिकार करत साजरी केली विजयाची हॅटट्रिक
- ३० एप्रिल नंतर लस न घेणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर फिरू देणार नाही- आस्तिककुमार पांडे
- नव्या ऑक्सिजन टँकमुळे औरंगाबादच्या रुग्णांना दिलासा, खासदार इम्तियाज जलील यांची माहिती
- घाणेरड्या राजकारणापासून दुर होऊन सरकारने कोराेना परिस्थिती निट हाताळावी : आमदार बोर्डीकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

