Share

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने निर्विवाद विजय मिळवला-चंद्रकांत पाटील

Published On: 

सिंधुदुर्ग : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आला आहे. ही निवडणूक भाजप नेते नारायण राणे यांनी जिंकली असून महाविकास आघाडीला धूळ चारली आहे. नारायण राणे आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल तर भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समृद्धी पॅनल रिंगणात होते. भाजपने एकूण ११ जागांवर विजय मिळवला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने निर्विवाद विजय मिळवला आहे. ११ जागांवर भाजपाने आपली विजयी पताका फडकावली आहे. सर्व विजयी शिलेदारांचे मनःपूर्वक अभिनंदन!’, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

https://twitter.com/ChDadaPatil/status/1476820087361310723

या निवडणुकीत एकूण ९८ .६७ टक्के मतदान झाले होते. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. ९८१ पैकी ९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन राऊंडमध्ये ८ टेबलांवर एकाच वेळी करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली गेली. एकूण १९ जागांपैकी ११ जागा भाजपने जिंकल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!