औरंगाबाद : शनिवार 19 मार्च रोजी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे औरंगाबाद येथील विमानतळावर रात्री गेल्या असता माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. म्हणाल्या, राज्यातील महा विकास आघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएम कडून महाविकास आघाडी युतीचा प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटत असताना पाहायला मिळत आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना एमआयएम कडून महाविकास आघाडी ला देण्यात आलेल्या युतीच्या प्रस्तावावर भाष्य केले आहे.
म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारने कोणाला घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे खासदार धनंजय मुंडे यांच्यावर ही त्यांनी निशाणा साधला. माझ्या संपर्कात सर्व पक्षाचे नेते असतात कारण माझा राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच एमआयएम प्रस्तावास संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या महाविकास आघाडी सरकारने कोणाला घ्यायचे आणि कुणासोबत जायचे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न असून कोणी त्यांच्यासोबत गेले तरी भाजपा संपूर्ण ताकदीने लढणार. सत्तेतून कोणाला हठवण्यासाठी आमचं राजकारण नाही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

