अहमदनगर: देवेंद्र फडणवीस यांचं पिंड हे विरोधी पक्षनेतेपदाचं असून फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचं चांगलं काम करावं असे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. संगमनेर येथे ते आज पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस यांना मी कोल्हापुर येथे सांगितलं होतं की तुम्ही आरसा पाहा तुम्हाला विरोधी पक्षनेता दिसेल, असा खोचक टोला देखील थोरात यांनी फडणवीसांना लगावला आहे.
पुढे बोलताना ते असेही म्हणाले कि, “देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत कि, २०२४ ला पुन्हा येणार आहेत. या आधीही ते जेव्हा निवडणुकीत म्हणाले होते कि मी पुन्हा येईन, तेव्हाच मी म्हणालो होतो कि, देवेंद्रजींनी आरश्यापुढे उभं राहावं. त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल”.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

