🕒 1 min read
मुंबई : साऊथ चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवणे ही बॉलीवूडची सवय झाली आहे. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’पासून ते अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’पर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपट आहेत, जे साऊथचे चित्रपट पाहून बनले आहेत. आता या यादीत आणखी एका नावाची भर पडणार आहे. अभिनेता वरुण धवनने एका नवीन प्रोजेक्टसाठी प्रसिद्ध साऊथ दिग्दर्शक अॅटलीसोबत हातमिळवणी केल्याचे वृत्त आहे.
‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या वरुणने ‘मै तेरा हिरो’, ‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बदलापूर’, ‘एबीसीडी 2’, ‘कुली नं. 1’, ‘जुडवा 2’, ‘दिलवाले’, ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’, ‘कलंक’, ‘स्ट्रीट डान्सर 3D’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या भूमिकांचं विशेष कौतुक देखील झालं आहे.
दरम्यान, वरुण आणि अॅटली चित्रपटात एकत्र काम करणार असल्याची बातमी आहे. या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पण असे बोलले जात आहे की अॅटली वरुण धवनसोबत त्यांच्याच चित्रपट थेरीचा हिंदी रिमेक बनवणार आहेत. अॅटली यांनी हा चित्रपट २०१६ मध्ये बनवला होता. यामध्ये साऊथ सुपरस्टार विजय आणि समंथा रुथ प्रभू यांनी काम केले आहे.
ई-टाइम्सने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “वरूण अॅटलीला भेटला आहे. ते दोघे लवकरच साऊथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर काम करणार आहेत. तो चित्रपट विजय आणि सामंथाचा थेरी असण्याची दाट शक्यता आहे”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
