Share

प्रकाश राज यांनी लगावला टोला; नोटबंदी, कोरोना, जीसटीची आठवण करून देत म्हणाले, तुम्ही या फाईल्सकडेही…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेते प्रकाश राज यांनीही या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे.  त्यांनी काही घटनांची आठवण करून दिली आहे.

आपल्या ट्वीटरवर प्रकाश राज यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गोध्रा हत्याकांड, दिल्ली दंगल, जीएसटी लागू केल्यावेळची आंदोलनं, नोटबंदीच्या वेळची परिस्थिती, कोविडच्या सुरुवातीच्या काळात मजुरांचं होणारं स्थलांतर, गंगेचं प्रदुषण या सगळ्याच्या फोटोंचं कोलाज केलेलं आहे. या ट्वीटमध्ये प्रकाश राज म्हणतात, निर्माते झालेले प्रिय सर्वोच्च अभिनेते, तुम्ही या फाईल्सकडेही लक्ष द्याल का आणि तेही प्रदर्शित कराल का?

प्रकाश राज हे देशातल्या सामाजिक राजकीय परिस्थितीवर सातत्याने भाष्य करत असतात. आपले विचार आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. त्यांचं हे ट्वीट द कश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सध्या सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरील आहे एवढं तर निश्चित! मात्र त्यांनी ट्वीटमध्ये लगावला टोला कोणाला लगावला आहे हे मात्र निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे ते अद्याप गुलदस्त्यातच आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!