लातूर: ग्रामविकास विभागामार्फत राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत ‘महा आवास अभियान ग्रामीण’ राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत राज्यातील ३ लाख २२ हजार २२९ घरकुलाची कामे पूर्ण होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई प्रातिनिधिक स्वरुपात पाच कुटुंबांना घरकुलाची चावी देऊन इतर सर्व कुटुंबाचा ई- गृहप्रवेश कार्यक्रम दुरचित्र प्रणालीद्वारे संपन्न झाला. हा कार्यक्रम मंगळवारी दि. १५ जून रोजी पार पडला.
लातूर जिल्ह्यात या ‘महा आवास अभियान ग्रामीण’ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या १ हजार ७०९ मंजूर घरकुला पैकी ५३३ घरकुलाचे काम पूर्ण झाले तर राज्य पुरस्कृत योजनेच्या २ हजार ८५९ मंजूर घरकुला पैकी १ हजार ५४३ घरकुलाचे काम पूर्ण झाले असून सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायत व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एकूण २ हजार ७६ कुटुंबांना घरकुलाच्या चाव्या देण्यात आल्या.
दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत जिल्ह्यात महा आवास अभियान ग्रामीणची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येऊन प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरकुला पैकी ५३३ घरकुलाचे काम शंभर टक्के पूर्ण केले तर उर्वरित घरकुलाचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजने अंतर्गत १ हजार ५४३ घरकुलाचे काम शंभर टक्के पूर्ण करून उर्वरित घरकुलाचे कामे प्रगतीपथावर आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
तसेच राज्यस्तरावरून घरकुल मार्ट अंतर्गत १० चे उद्दिष्ट देण्यात आले होते परंतु जिल्ह्याने २६ घरकुल मार्ट पूर्ण केले असून या अंतर्गत महिला बचत गटाने बांधकामाचे साहित्य या योजनेतील घरकुलांना पुरवठा करणे हा योजनेचा उद्देश असल्याची माहिती प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी दिली. तसेच आज जिल्ह्यातील २०७६ कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातील घरकुलाची चावी देण्याचा कार्यक्रम जिल्हा पंचायत समिती व ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात आला व सर्व कुटुंबांना चाविचे वितरण करण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.
जिल्हास्तरावरील कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी देण्यात येऊन त्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात आले. या ई-गृह प्रवेश कार्यक्रमास मुंबई येथून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या लाटेसाठी औरंगाबाद मनपाला हवेत ७७ कोटी ७३ लाख रुपये, राज्यशासनाकडे पाठवला प्रस्ताव!
- बीडमध्ये रेशन दुकानदारकडून लाच घेतना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात औरंगाबादेत बहुजन मुक्ती पार्टीचे ‘वाहनांना धक्का’ मारो आंदोलन!
- राहुल गांधींची वादग्रस्त प्रकरणी टीका आणि योगींनी संतापात राहुल गांधींची लाजच काढली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

