Share

Upcoming Car Launch | Tata सफारी इलेक्ट्रिक कार होणार लवकरच लाँच

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन कार बाजारात लाँच करत असते. टाटा ही देशातील लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी असून लोक तिच्या नवीन मॉडेल्सच्या लाँचची आतुरतेने वाट बघत असतात. सध्या टाटा मोटर इलेक्ट्रिक ‘ग्रीन एनर्जी’ वाढवण्याचा प्रचार करत आहे. टाटा त्यांच्या कार मध्ये फोर-व्हील ड्राईव्ह (FWD4WD) फीचर आणण्यावर काम करत आहे. त्याचबरोबर कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या लोकप्रिय मॉडेल्सना कंपनी इलेक्ट्रिक वेरियंट मध्ये अपडेट करण्यामध्ये गुंतलेली आहे.

Tata इलेक्ट्रिक सफारी

सफारी ही देशातील लोकप्रिय कार आहे. प्रामुख्याने सफारी हा Tata Harrier SUV 7- सीटर चा प्रकार आहे. टाटा सध्या सफारी इलेक्ट्रिक कारसह अधिकाधिक इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. 4WD फीचरसह टाटा आपल्या कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Tata’s इलेक्ट्रिक सेगमेंट

येणाऱ्या पुढील तीन वर्षात टाटा आपल्या इलेक्ट्रिक कारवर मोठी गुंतवणूक करणार आहे. येत्या काळात कंपनी नवीन दहा इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याच्या विचारात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला टाटा ने Curvv आणि Avinya संकल्पना प्रदर्शित केल्या होत्या. टाटा सध्या नेक्सन कॉम्पॅक्ट SUV मॉडल्स च्या फोर-व्हील ड्राईव्ह (FWD) सिस्टीमवर काम करत आहे. या ऑप्शनसह हॅरिअर आणि सफारी कार ऑफरोड सारख्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देण्यास सक्षम होतील. मारुती आणि टोयोटा यांनी त्यांच्या ग्रँड विटारा आणि अर्बन क्रुझर हायरायडर या मध्यम आकाराच्या SUV मध्ये फोर-व्हील ड्राईव्ह फीचर उपलब्ध करून दिले आहे.

Tata’s इलेक्ट्रिक कार किंमत

टाटा मोटर्स ने नुकतीच लॉंच केलेली इलेक्ट्रिक कार ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. टाटा ने ही कार XE, XT, XZ+ आणि XZ+Tech Lux या चार प्रकारांमध्ये लाँच केली होती. ज्यांची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपये एवढी होती. 10 ऑक्टोबरपासून या कारचे बुकिंग करता येईल, अशी घोषणा टाटा ने केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Cars And Bike

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या