🕒 1 min read
नवी दिल्ली- देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जवळपास शंभरीपार पोहोचल्या आहेत पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणवं अशी मागणी होत आहे. आज संसदेचे कामकाज सुरू होताच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
विरोधकांनी पेट्रोल आणि डिझेलवर स्वतंत्र चर्चा करण्याची मागणी केली. या सर्व प्रकारामुळे सोमवारी दोन्ही घरे सहजतेने चालू शकली नाहीत.दरम्यान देशाचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या वर्षात गॅस सिलिंडर्सच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत.पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवून सरकारी उत्पन्नात 459 टक्के वाढ झाली असल्याचे त्यांनी कबूल केले.
दरम्यान,पेट्रोल-डिझेलचा अंतर्भाव वस्तू व सेवा कर – ‘जीएसटी’मध्ये केला गेल्यास, शंभरी गाठलेल्या पेट्रोलच्या किमती लिटरमागे ७५ रुपयांवर सहज आणता येऊ शकतील, असं स्टेट बँकेच्या अर्थविश्लेषकांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं. त्यावर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत उत्तर दिलं आहे.
‘पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी जीएसटी परिषदेकडून शिफारस करणं आवश्यक आहे. पण आतापर्यंत अशी कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही,’ असं ठाकुर यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलं आहे. ठाकुर यांच्या या उत्तरानंतर पेट्रोल-डिझेलचे दर प्रति लिटर ७५ रुपयांवर येणार नसल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे.
महत्वाच्या बातम्या
- माझ्या वडिलांनी ऊस तोडला, मजुरांच्या व्यथा मी जाणतो-धनंजय मुंडे
- कोरोनाने शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम थांबवली
- खा.जलील यांच्या कार्यालयामागील इमारत जमीनदोस्त
- रुग्णसंख्या वाढली! सोयगावचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू
- पाचशे रुपयांवरून दोन पोलिसांत तुंबळ हाणामारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
