Share

प्रेम विवाहानंतर गर्भपात न केल्याने विवाहितेला हाकलले

Published On: 

औरंंगाबाद : आंतरधर्मीय प्रेम विवाहानंतर गर्भपात न केल्याच्या कारणावरुन पतीने शिवीगाळ, मारहाण करुन घराबाहेर हाकलले. हा प्रकार नुकताच समोर आला आहे. पदमपुरा भागात ही घटना घडली असून, पोलिसांनी पीडीतेचा पती आशिष भरत गोरे याला अटक केली आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पदमपुरा भागातील एका ३० वर्षीय पीडीतेचे आशिष गोरे याच्यासोबत सन २००७ पासून आंतरधर्मीय प्रेमसंबंध होते. त्यावेळी आशिष हा पीडीतेला तुझ्यासोबतच लग्न करीन असे म्हणत शारिरिक संबंध ठेवत होता. त्यातून तिला गर्भधारणा झाली. मात्र, आशिषने तिला गोळ्या देऊन गर्भपात केला. असा प्रकार दोनवेळा झाल्यानंतर पीडीतेने पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन गेलेल्या आशिषने नोंदणी पध्दतीने पीडीतेशी सन २०१८ मध्ये विवाह केला.

आता तुझ्याशी लग्न केले आहे. तुला पोलिसात तक्रार देता येणार नाही, तेव्हा तू गर्भपात कर असे म्हणत आशिषने तिला नांदविण्याचे आमिष दाखवले. पण पीडीतेला त्याच्या घरी नेले नाही. तसेच शिवीगाळ, मारहाण करुन नांदविण्यास नकार दिला. त्यावरुन पीडीतेने गुरुवारी रात्री वेदांतनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्याची माहिती निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!