लातूर: तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसेविर इंजेक्शनाचा तुटवडा भासत असल्याने गंभीर रुग्णांचा मृत्यु होत आहे. अनेक जण योग्य उपचार घेऊन तसेच काळजी घेऊन बरे देखील होत आहे. अशाच एका ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यशस्वी उपचारानंतर त्या कोरोना मुक्त झाल्या आहेत. आपल्या आयुष्याची जोडीदार असलेली पत्नी कोरोना मुक्त झाल्याने पतीने चक्क वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करत ऋण व्यक्त केले आहे.
उदगीर शहरातील आझादनगर भागात राहणाऱ्या दायमी कौसर फातेमा आजिमोद्दिन या कोरोना बाधित होऊन उपचारासाठी येथील शासकीय कोविड हेल्थ सेंटर मध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ६५ पर्यंत कमी झालेले होते. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती. अशा गंभीर परिस्थितीत कोविड हेल्थ सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत डांगे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गंभीर रुग्णाला धीर देत यशस्वीरित्या उपचार केले. दहा दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर दायमी कौसर फातेमा आजिमोद्दिन या कोरोना मुक्त झाल्या.
वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून आपली पत्नी कोरोना मुक्त झाल्याने पती आजिमोद्दिन दायमी यांनी प्रथम ईश्वराचे व देवदूत असलेल्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपकार मानले. तर कोविड हेल्थ सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. शशिकांत डांगे तसेच इतर कर्मचाऱ्यांना शाल व पुष्पहार देऊन सत्कार करीत त्यांच्या कार्याला सलाम केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- लॉकडाऊन घ्या आणि घरी बसा, बाकी मेलात तरी ती तुमची जबाबदारी; राणेंची बोचरी टीका
- पैठण पोलिसांकडून अवैध दारु साठा जप्त
- ‘महात्मा फुले योजनेतंर्गत मोफत कोरोना उपचार देणे ही राज्याची जबाबदारी’, हायकोर्टाचे आदेश
- औरंगाबाद ‘मनपा निवडणूक’: शपथपत्र दाखल करण्यासाठी आता फक्त ४ आठवड्यांची मुदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

