Share

पैठण पोलिसांकडून अवैध दारु साठा जप्त

Published On: 

औरंगाबाद : पैठण तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाचे मोठे जाळे असतांना या विभागाची अवैध दारु बाबत कधीच कुठलीच कारवाई झाल्याचे आजपर्यंत दिसुन आले नाही. त्या उलट पैठण पोलिसांनी या पंधरा दिवसात दोन कारवायांत जवळपास १० लाखाचा मुद्देमाल दारुसह जप्त केला आहे.

मंगळवारी दि.२७ रात्री शेवगाव जिल्हा अहमदनगर येथुन दोन ईसम स्विफ्ट कार क्रमांक एम.एच.१२ जेयु ४७५९ मध्ये अवैध देशी दारु पैठणकडे घेऊन येत असल्याची खबर पो.नि.किशोर पवार यांना मिळाली त्यांनी अपल्या सहकारी कर्मचा-यांसह पैठण शहागड रोडवरील कमानी जवळ सापळा रचला असता वाहानातुन ६० हजार रुपयाची देशी दारु व ४ लाख रुपये किंमतीच्या वाहानातुन वाहातुक करतांना अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

दरम्यान, गेल्या बुधवारी देखील पैठण पोलिसांनी जवळपास देशी दारुसह ७ लाख रुपयाचा अवैध देशी दारुचा साठा जप्त केला होता. शहरासह तालुक्यात सुरु असलेल्या प्रचंड प्रमाणातील दारुच्या काळ्याबाजारीची खबर उत्पादन शुल्क विभागाला कशी होत नाही? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थीत होत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!