मुंबई: मालाडमधील एका क्रिडा संकुलाला दिलेल्या नावावरून सध्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात वाद पेटला आहे. महापालिकेने या क्रिडा संकुलाला वीर टिपू सुलतान (eer Tipu Sultan Naming)असे नाव दिल्याचा आरोप करत भाजपने काल क्रिडा संकुलासमोर आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांची आणि बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची धरपकडही केली. मात्र मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख (Guardian Minister Aslam Sheikh) यांनी या मैदानाला टिपू सुलतान हे नाव आधी पासूनच आहे. आता फक्त या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
अस्लम शेख यांनी भाजपने रस्त्यांना टिपू सुलतान नाव दिलं, आता भाजप केवळ निवडणुका आल्यात म्हणून राजकारण करत आहे. ज्या भाजपा नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) राजीनामा घेणार का? असा सवाल केला आहे. तसेच आता भाजपच्या पोटात अचानक का दुखू लागले? असा सवालही अस्लम शेख यांनी केला आहे.
तसेच इंग्रजांच्याविरोधात लढत लढत ज्यांनी आपला जीव दिला ते वीर टिपू सुलतान होते. या मैदानाच्या नावापेक्षा येथे काय सुविधा आहेत, मुलांना काय फायदा होणार याचा विचार करावा. तुम्ही नावावर जाऊ नका काम बघा, असा सल्ला देत भाजपाचे जे वरिष्ठ नेते या नावाला विरोध करत आहे त्यांनी स्वत:च्या पक्षाच्या नगरसेवकांना आणि सध्याच्या आमदाराला विचारलं पाहिजे की तुम्ही आपल्या मतदारसंघामधील या रस्त्याला वीर टिपू सुलतान असं नाव का दिलं? निवडणुका आल्या म्हणून तुम्हाला हे सर्व दिसत आहे. यापूर्वी का नाही विरोध केला. असा सवालही अस्लम शेख यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्र सरकारकडेच द्या- चंद्रकांत पाटील
- ‘त्या’ चर्चांना उधान; गुलाबराव पाटील थेट गिरीश महाजनांच्या घरी
- ध्वजारोहणावेळी रश्मी आणि आदित्य ठाकरेंनी केला आचारसंहितेचा भंग; मुंबईत तक्रार दाखल
- “ज्याच्यात दम असतो तो निवडून येतो”, नगरपंचायत निवडणुकीवरून गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका
- …त्या कार्यक्रमातील ६३ सहभागींपैकी मी एक होतो- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

