मुंबई : बिहारमध्ये रेल्वे भरती बोर्डाच्या एनटीपीसी परीक्षेत हेराफेरी झाल्याचा आरोप करत अजूनही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. याआधी मंगळवारी संतप्त विद्यार्थ्यांनी पाटणा, सीतामढी, मुझफ्फरपूर, आरा, बक्सर येथे रेल्वे मालमत्तेचे नुकसान केले. या घटनेवरूनच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
“उत्तर प्रदेशातील आंदोलक विद्यार्थ्यांची ‘संपत्ती’ जप्त करण्याचे आदेश योगी सरकारने (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) दिले आहेत. त्यांच्याकडे संपत्ती असती तर नोकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरले असते का? बहुधा त्यांची पेनं, पुस्तकं आणि पदव्या जप्त करतील.”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच ‘हिटलरचा बाप’ असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.
उत्तर प्रदेशातील आंदोलक विद्यार्थ्यांची 'संपत्ती' जप्त करण्याचे आदेश योगी सरकारने दिलेत.
त्यांच्याकडे संपत्ती असती तर नोकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरले असते का? बहुधा त्यांची पेनं, पुस्तकं आणि पदव्या जप्त करतील.#हिटलर_चा_बाप
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 27, 2022
दरम्यान विद्यार्थ्यांचा वाढता आक्रोश पाहता रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांच्या मागणीची चौकशी करण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन केली आहे. १६ फेब्रुवारीपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. प्रश्न सोडविण्यासाठी सर्व समित्यांना प्रस्ताव सादर करण्यासाठी ४ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “ट्विटरला मोहरा बनू देऊ नका…”, राहुल गांधींचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र
- “ज्या भाजपा नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतानचं नाव दिलं, त्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का?”
- रोहितच्या कर्णधारपदाचे नवे पर्व सुरू!; वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेसाठी संघाची घोषणा
- दुःखद! ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट यांचे निधन
- “कुठे हरवलास पाखरा, परत ये रे आमच्या लेकरा”, आमदार विजय रहांगडालेंची मुलगा अविष्कारसाठी भावनिक पोस्ट

