🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवर जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातून सहा राज्यसभेच्या जागा निवडून येतात. परंतु सहाव्या जागेसाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने, मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना सहाव्या जागेसाठी ठाम आहे. संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारीसाठी शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट ठेवली होती. आता एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेने सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. आता कोल्हापुराचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचं शिवसेनेने जवळपास निश्चित केलं आहे.
संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट करुन शिवसेनेने राज्यसभेसाठी आपला उमेदवार फायनल करण्यात आला आहे. कोल्हापुरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नावाला शिवसेनेने पसंती दर्शवली आहे. काही वेळातच संजय पवार या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी धुडकावली होती. आता कोल्हापुरातल्या शिवसेना नेत्याचा राज्यसभेसाठी विचार केला जात आहे, त्यामुळे संभाजीराजेंना लवकर आपला निर्णय घ्यावा लागणार असे दिसत आहे. जर संभाजीराजेंनी उमेदवारी नाकारली तर उद्धव ठाकरे पक्षातील नेत्यांनाच उमेदवारी देण्यावर ठाम आहेत. संभाजीराजेंना निर्णय घेण्यासाठी शिवसेनेने वेळ दिला होता. आता शिवसेनेनने संभाजीराजे यांचा पत्ता कट करणार असे सूत्रांकडून समजते आहे. कोल्हापुराचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
