Share

IPL 2022 GT vs RR Qualifier 1 : हार्दिक पंड्या संघात करणार ‘हे’ दोन बदल? ‘अशी’ असू शकते दोन्ही संघांची playing 11!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा पहिला क्वालिफायर सामना (Qualifier 1) गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. दुसरीकडे, पराभूत संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्याचा सामना एलिमिनेटरच्या विजेत्याशी होईल. गुजरात आणि राजस्थान हे दोन्ही संघ मोठ्या लयीत आहेत. गट फेरीत गुजरातने १० सामने तर राजस्थानने ९ सामने जिंकले होते.

गुजरात टायटन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यात १६८ धावा करूनही पराभव पत्करावा लागला. यानंतरही हार्दिक पंड्याने प्रमुख खेळाडूंना संधी दिली. या सामन्यासाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये लॉकी फर्ग्युसनच्या जागी अल्झारी जोसेफचे पुनरागमन होऊ शकते. यासोबतच मॅथ्यू वेडची जागाही धोक्यात आली आहे. त्यांच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळू शकते.

गोलंदाजीत खराब सुरुवात करूनही राजस्थान रॉयल्सने शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला १५० धावांवर रोखले. त्याआधी लखनऊ सुपर जायंट्सलाही राजस्थानविरुद्ध १५४ धावा करता आल्या होत्या. शिमरॉन हेटमायरचेही संघात पुनरागमन झाले आहे. अशा स्थितीत संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

दोन्ही संघांची संभाव्य playing 11

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कप्तान ), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी.

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मॅकॉय.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!