🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या मोसमात आज प्लेऑफचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा क्वालिफायर-१ सामना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात होईल. या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर काही मजेदार फोटो समोर आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचा प्रशिक्षक आशिष नेहरा राजस्थान संघाचा स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहलला लाथ मारताना दिसत आहे.
चहल आणि नेहराचे फोटो शेअर करत गुजरात टायटन्सने कॅप्शनमध्ये लिहिले, “या किकवर युझी आणि नेहराजींना एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.” या दोन संघांमध्ये कोलकाता येथील ईडन पहिला क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी दोन्ही संघांनी सोमवारी संध्याकाळी सराव सत्राचे आयोजन केले होते. यादरम्यान गुजरात आणि राजस्थान संघाचे खेळाडू एकमेकांना भेटले. यापूर्वी युझवेंद्र चहल आणि राशिद खान यांचीही भेट झाली होती.
Absolutely Kicked to have Yuzi and Nehraji bless us with this moment ????????????#AavaDe #SeasonOfFirsts #GTvRR pic.twitter.com/OlXTazPZJw
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 24, 2022
लीग टप्प्यात चहलने १६.५३च्या सरासरीने आणि ७.६७च्या इकॉनॉमी रेटने २६ विकेट्स घेतल्या आहेत. युझवेंद्र चहलने क्वालिफायर १ मध्ये आणखी २ विकेट घेतल्या, तर तो आयपीएलमधील सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत, अमित मिश्राला (१६६) मागे टाकून तिसऱ्या स्थानावर जाईल. यासह तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
