🕒 1 min read
मुंबई : निळेशार पाणी असलेला समुद्राच्या शेजारी अभिनेता आयुष्मान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप ऍन्जॉय करतांना दिसत आहेत. ताहिरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून यावर कॅप्शनही लिहिले आहे. यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.
आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी ताहिरा नेहमीच चाहत्यांबरोबर शेअर करते. ताहिरा पती आयुष्मान बरोबर सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सध्या ते दोघे मालदीवला आहेत. ताहिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका जहाजामध्ये उभी आहे. तसेच तिच्या समोर निळेशार पाणी असलेला समुद्र आहे. यामध्ये तिने पिवळ्या रंगाची एक बिकिनी घातली आहे. यामध्ये ती खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,’मी मी आहे, आणि मी माझं मन, शरीर आणि आत्मा जसे आहे तसे स्वीकारते. आजूबाजूचा निळा परिसर आणि स्वतःला पाहून मी माझ्या प्रेमात पडले आहे.’
तिचे हे फोटो आयुष्मानने क्लिक केले आहेत. तसेच पुढे तिने पती आयुष्मान बद्दल लिहिले की, ‘आयुष्मान म्हणाला ही तुझी सर्वात बेस्ट प्रोफाईल आहे.’ तिच्या या फोटोवर काही कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत. तसेच पती आयुष्मानने तिला यावर फायर ईमोजी पाठवले आहेत.ताहिरा ही एक लेखिका आणि प्राध्यापिका आहे. साल २०११ मध्ये या दोघांनी विवाह केला. तसेच या दोघांना दोन मुले देखील आहेत. या फोटोवर अभिनेत्याच्या एका चाहत्याने तिच्या या फोटोवर कमेंट करत लिहिले आहे की,’ताई तुझे झाले असेल तर आयुष्मानला चित्रपट बनवायला सांग. खूप दिवस झाले त्याचा नवीन चित्रपट नाही आला.’ ही कमेंट सर्वांना हसायला लावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
